बीवायके महाविद्यालयाचे विक्रमी २३ वे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 06:04 PM2018-11-05T18:04:36+5:302018-11-05T18:05:11+5:30

नाशिक : नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत यंदाचेही विजेतेपद पटकावून ...

byk,colleges,record,title,divissional,sport | बीवायके महाविद्यालयाचे विक्रमी २३ वे विजेतेपद

बीवायके महाविद्यालयाचे विक्रमी २३ वे विजेतेपद

Next
ठळक मुद्देकामगिरी : पाच खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठीं निवड

नाशिक: नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत यंदाचेही विजेतेपद पटकावून आपला दबदबा कायम राखला. महाविद्यालयाचे हे विक्रमी २३ विजेतेपद ठरले आहे.
महाविद्यालयाच्या संघाकडून खेळताना सोहम गज्जरने पाच सामन्यात १० बळी मिळविले. फलंदाजीमध्ये प्रणव पवारने प्रत्येक सामन्यात ्रआक्रामक फलंदाजी करून पाच सामन्यात एकुण १२० धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील खेळाडू आनंद विश्वकर्माने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पाच सामन्यात तब्बल १८५ धावांचे रतीब घातले आणि आपल्या संघाच्या विजयासाठी मोलाची कामिगरी केली.
बीवायके महाविद्यालयाने उपांत्य फेरीत केटीएचएम  या संघाचा ६५ धावांनी पराभव केला, तर अंतिम फेरीत पंचवटी महाविद्यालयाचा २३ धावांनी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बीवायकेच्या खेळाडूंच्या या कामिगरीमुळे त्यांच्या पाच खेळाडूंची नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोहम गज्जर, अमित मैंद, प्रणव पवार, आनंद विश्वकर्मा आणि प्रदुन्म राखे यांचा समावेश आहे. पुणे विभागाच्या अंतर विभागीय स्पर्धा सिहंगड इन्स्टिटयूट, लोणावळा येथे होणार असून हे खेळाडू या स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती डॉ. सुनील मोरे यांनी दिली.
संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण सचालक डॉ. सुनील मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या विजयामुळे गोखले एज्युकेशन सोसायचे सरचिटणीस डॉ. एम. एस. गोसावी, बी. वाय. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, गोखले एज्युकेशनच्या संचालक प्राचार्या दिप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक शैलेश गोसावी, आदिंनी अभिनंदन केले.

 

 

 

Web Title: byk,colleges,record,title,divissional,sport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.