आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक

By admin | Published: July 18, 2016 12:21 AM2016-07-18T00:21:40+5:302016-07-18T00:21:52+5:30

नाशिकरोड प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब)

Bypolls in August 2016 | आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक

आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक

Next

नाशिक : नाशिकरोड विभागातील मनसेचे नगरसेवक नीलेश तुकाराम शेलार आणि शोभना संजय शिंदे यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरविल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ३५ (ब) आणि प्रभाग क्रमांक ३६ (ब) मधील सदस्यपदासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये पोटनिवडणूक होणार असून, त्यासाठी शनिवारी (दि.१६) प्रारूप मतदारयादी घोषित करण्यात आली. प्रारूप मतदारयादीनुसार दोन्ही प्रभाग मिळून १७३४ मतदार वगळण्यात आले आहेत. सदर प्रारूप मतदारयादीसंबंधी २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
सप्टेंबर २०१४ मध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्हिप बजावूनसुद्धा पक्षविरोधी मतदान करणारे नाशिकरोडचे नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांचे सदस्यपद रद्दबातल ठरविण्याचा महत्त्वपूर्ण निकाल विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दि. २९ मार्च रोजी दिला होता. या निर्णयाविरोधी शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी अद्याप त्यासंबंधी न्यायालयाचा कुठलाही आदेश महापालिकेला प्राप्त झालेला नाही. पोटनिवडणुकीची प्रारूप मतदारयादी१७३४ मतदार वगळले : शनिवारपर्यंत हरकती, सूचना मागविल्यात्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. सदर रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली.
प्रारूप मतदारयादीनुसार, प्रभाग ३५ मध्ये १० हजार ९९३, तर प्रभाग ३६ मध्ये १०७२४ मतदारसंख्या आहे. त्यात प्रभाग ३५ मधून ६७० मतदार, तर प्रभाग ३६ मधून १०६४ मतदार वगळण्यात आले आहेत. पुरवणी यादीत प्रभाग ३५ मध्ये ४९०, तर प्रभाग ३६ मध्ये ३२४ मतदार वाढले आहेत. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ३५ मध्ये दहा हजार ४८४, तर प्रभाग ३६ मध्ये ११ हजार ४४५ मतदार होते. सदर प्रारूप मतदारयादीविषयी २३ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अंतिम मतदारयादी ३० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ जुलै २०१६ रोजी अस्तित्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेमार्फत प्रारूप मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी दोन्ही प्रभागांसाठी प्रत्येकी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, तर प्राधिकृत अधिकारी म्हणून उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांना नियुक्त करण्यात आले आहे. अंतिम मतदारयादी घोषित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Bypolls in August 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.