पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगी ‘आदर्श कोच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:45 AM2018-04-02T00:45:03+5:302018-04-02T00:45:03+5:30
पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिकरोड : मनमाड-मुंबई दररोज धावणाऱ्या व नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. पंचवटीच्या सी-३ या बोगीचे ‘आदर्श कोच’ म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी आदर्श कोच म्हणून नोंद झालेल्या रेकॉर्डच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे भुसावळ मंडल प्रंबधक आर. के. यादव, मुख्य मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता एन. के. अग्रवाल, मुख्य मंडल सिग्नल नियंत्रक प्रबंधक अजयकुमार दुबे, मुख्य वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, रेल परिषदचे अध्यक्ष बिपीन गांधी, उपाध्यक्ष व्ही. जे. आर्य, गुरुमितसिंग रावल, पी. के. घुगे, सागर कासार, प्रकाश महाजन, अभिजित रानडे, के. के. चर्तुवेदी, अशोक हुंडेकरी, वाल्मीक देसले, मिलिंद कुंभेजकर आदींसह प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये विविध सेवा देणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला.
भुसावळ विभाग रेल्वे प्रंबधक आर. के. यादव यांनी पंचवटी एक्स्प्रेससाठी नवीन रेक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे सांगितले, तर रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेस आदर्श होण्यासाठी करण्यात आलेले नियम सर्व प्रवाशांनी पाळून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. सूत्रसंचालन गुरुमितसिंग रावल व आभार सागर कासार यांनी मानले.