कोबी पिकावर काटकरपा रोग
By admin | Published: August 21, 2016 10:13 PM2016-08-21T22:13:13+5:302016-08-22T00:07:05+5:30
शेतकरी चिंतातुर :पावसामुळे अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषध फवारणी
Next
खामखेडा : खामखेडा गावासह जिल्ह्यात कोबी पिकावर काटकरपा व अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा, सावकी, पिळकोस, भादवन, विसापूर, भऊर, बगडू आदि परिसरात कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हे पीक आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे पीक घेतले जाते. या उत्पादनावर शेतकऱ्यांनी अनेक स्वप्नं फुलविली आहेत. कोबी उत्पादनात खामखेडा व परिसराचे नाव गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा आदि ठिकाणी घेतले जाते. त्यामुळे तरूणांना कमिशन म्हणून रोजगार मिळतो. मजूर वर्गाला काम मिळते. (वार्ताहर)