कोबी-फ्लॉवरचे कोसळले दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:50 PM2020-02-28T15:50:14+5:302020-02-28T15:51:42+5:30
शेतकरी चिंतित : उत्पादन खर्च भरुन निघणे अवघड
खामखेडा : दर कोसळल्यामुळे कोबी व फ्लॉवर कवडीमोल भावाने विक्र ी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असल्याने पिकासाठी केलेला खर्च भरुन निघणेही अवघड होऊन बसले आहे.
खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात कोबी या पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे गुजरात मघील अहमदाबाद ,नवापूर, भरु च, सूरत आदि मार्केट मघ्ये कोबीसाठी खामखेडाचे नाव प्रसिद्ध आहे. गुजरात मधील काही व्यापारी कोबी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. यामुळे गावातील काही स्थानिकांनाही रोजगार मिळतो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उन्हाळी कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले. कांद्याच्या रोपा अभावी लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकऱ्यांचे काही क्षेत्र पडून होते. त्यामुळे शेतक-यांनी या जागेवर कोबी व फ्लॉवर पिकाचे लागवड केली. मध्यंतरी कांद्याला भाव असल्याने पर्याय म्हणून कोबीला मोठी मागणी होती. त्यामुळे पुढेही कोबीला भाव राहील या आशेने शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कोबी पिकांची लागवड केली. सुरवातीला कोबी जागेवर २० ते २५ रूपये विकली जात होती. आता भरपूर कोबी पिक आल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोबी व फ्लॉवरचा एक गड्डा पाच रु पयाला विकावा लागत आहे. एक गड्डा साधारण दोन किलोच्या असतो. मार्केट मघ्ये कोबी व फ्लॉवर विक्र ीसाठी नेले तर वाहन खर्चही निघत नाही. काही शेतकरी किरकोळ बाजारात जाऊन त्याची विक्री करत आहेत.
एकरी चाळीस हजार खर्च
कोबी पिक घेणे खर्चिक बनले आहे. कोबी पिकाला मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावे लागते. या फवारणीची औषधेही महागडी असतात. एक एकर कोबीसाठी बियाणे, लागवड खर्च, फवारणीचा खर्च यांचा सर्व विचार करता एकरी चाळीस हजार रूपये खर्च येतो. उत्पादन खर्चाचा विचार करता कोबीला निदान दहा ते पंधरा किलो रूपये बाजार भाव शेतक-यांना अपेक्षित आहे.