खामखेड्यात मादीला पकडण्यासाठी पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:10 PM2020-03-11T23:10:20+5:302020-03-11T23:11:17+5:30
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या
दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात त्वरित पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत होती. वनविभागाने पिंजरा लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन पिंजरा लावला व गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा
येथील फांगदर शिवारातील यशवंत पवार, दत्तू पवार व दत्तू हिरे यांच्या शेतात सोनू पवार व राकेश बच्छाव हे पिकांना पाणी देत असताना शेजारील टमाट्याच्या शेतात बिबट्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडाओरड करत शेतकºयांना आवाज दिल्याने शेतकरी जमा झाले. याची माहिती देवळा येथील वनविभागाला देण्यात आल्याने वनरक्षक शांताराम आहेर यांनी शेतात जाऊन पाहणी केली. तेव्हा शेतात बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले.
बिबट्याची मादी बछड्यांना घेण्यासाठी येईल असे वाटत होते. परंतु सलग दोन दिवस बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकºयांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. बछड्यांच्या शोधार्थ मादी केव्हा येईल याची भीती शेतकºयांत असल्याने त्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तेव्हा याची दखल घेऊन वनविभागाने पिंजरा लावला आहे.