बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:00 PM2019-12-18T13:00:23+5:302019-12-18T13:00:31+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नांदूरवैद्य येथे मागील आठवड्यातच नांदूरवैद्य गावाजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात एक बिबट्याची मादी व दोन बछडे निदर्शनास आल्याची घटना ताजी असतांना या बिबट्याने एका ऊसतोड कामगारावर हल्ला चढवला होता. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यामुळे नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. सदरचे वृत्त लोकमतमध्ये १ डिसेंबर रोजी प्रकाशित केल्यामुळे अखेर वनविभागाला जाग आली असून या परिसरात पिंजरा लावण्यात आला. एका आठवड्याच्या कालावधीमध्ये बिबट्याने बैलावर हल्ला चढवत ठार केले होते. परिसरात जवळपास एक महिन्यांपासून वास्तव्यात असलेल्या हा बिबट्या अधूनमधून नागरिकांच्या निदर्शनास येत असून भविष्यात एखादी मोठी घटना घडू शकते. नुकताच रोकडे यांच्या एका बैलावर सदर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे यावेळी येथील नागरिकांनी बोलून दाखवले. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे येथील गावातील व शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये मागील एक महिन्यापासून नांदूरवैद्य शिवारातील शेतवस्तीवर बिबट्याचा वावर वाढला असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण कर्पे यांचे एक वासरु घराजवळील पडवीत येऊन ठार केल्याची घटना घडली होती.य् ाामुळे जनावरांवर हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. परिसरात बागायती क्षेञ मोठयÞा प्रमाणावर आहे.तसेच या ठिकाणी ऊसाचे क्षेञ वाढले आहे.यामुळे बिबट्याच्या या दहशतीने ग्रामस्थ दिवसासुद्धा घाबरु लागले आहेत.यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.