औरंगपूर येथे बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजºयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:03 AM2017-12-15T00:03:25+5:302017-12-15T00:25:02+5:30
तालुक्यातील औरंगपूर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्याची मादी बंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्याची मादी बंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. बिबट्याने शेतवस्तीतील वासरू ठार केले होते. त्यामुळे औरंगपूर येथे राजेंद्र कारभारी खालकर यांच्या शेतात वनविभागाने १३ दिवसांपूर्वी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. बुधवारी (दि. १३) रात्री बिबट्याची मादी पिंजºयात अडकली. ही मादी तीन वर्षे वयाची आहे. त्यानंतर वनविभागास कळविण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल पी. एस. पाटील, वनपाल एम.एम. राठोड, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनरक्षक भरत पाटील, वनसेवक भय्या शेख, भारत माळी, पिंटू नेहरे, रामनाथ भोरकडे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. हा बिबट्या जेरबंद झाल्याने औरंगपूर येथील शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.