चिंचखेडला वादळी वाऱ्यामुळे गहू जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 02:10 PM2019-04-15T14:10:37+5:302019-04-15T14:11:12+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी लता अविनाश निकम यांच्या गट क्र मांक २६२ ड मधील (दीड बीगा) गहू जळून खाक झाला आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी लता अविनाश निकम यांच्या गट क्र मांक २६२ ड मधील (दीड बीगा) गहू जळून खाक झाला आहे. रविवारी अचानक सुटलेल्या वादळी वाºयामुळे लता निकम यांच्या शेताच्या कोपºयावर असलेल्या विद्युत रोहित्रवर विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठ्या प्रमाणात आगीच्या ठिणग्या सोंगनीला आलेल्या गव्हाच्या पिकावर पडल्या. गहू सोंगणीला आला असल्याने खाली पडत असलेल्या ठिणग्यांनी काही क्षणातच आगीचे रौद्ररूप धारण केल. सोंगणीला आलेला गहू आपल्या डोळ्यासमोर जळताना बघून निकम कुटुंबीय हताश झाले. अनपेक्षित संकटामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने भरपाईची प्रक्रिया पुर्ततेसाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे. चिंचखेडमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात वादळी वाºयासह तुटक तुटक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.