कर्जमाफीच्या पूर्वसंध्येपर्यंत आकडेमोड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:46 AM2017-10-18T00:46:56+5:302017-10-18T00:47:01+5:30

कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

The calculation continues till the debt ceiling | कर्जमाफीच्या पूर्वसंध्येपर्यंत आकडेमोड सुरूच

कर्जमाफीच्या पूर्वसंध्येपर्यंत आकडेमोड सुरूच

Next

नाशिक : कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.  राज्य सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जसरसकट माफ करण्याचे तर दीड लाखापुढील कर्जदार शेतकºयाने कर्जाची परतफेड केल्यास त्याचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.  शासनाने यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतल्यामुळे त्याला विलंब झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका सुरू केल्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केली व त्याचा मुख्य समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून, प्रत्येक जिल्ह्णात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकºयांना कर्जमुक्त झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्णातील १,७४,५२५ शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतले असल्याने तसेच अन्य राष्टÑीयीकृत बॅँकेचे कर्जदार मिळून एकूण १,८५,००० शेतकºयांनी शासनाच्या कर्जाची माहिती आॅनलाइन अपलोड केलेली असून, या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर शासनाच्या निकषात बसणाºया शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याचे शासनाने यापूर्वी जाहीर केले असले तरी, मंगळवारी सायंकाळपर्यंत शासनाने छाननी केलेली पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा बॅँक, सहकार खाते व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नव्हती. शासनाकडून फक्त जिल्हा बॅँकेचे दीड लाख रुपये कर्जदार असलेले फक्त ९० हजार व राष्टÑीयीकृत बॅँकेचे १६ हजार शेतकरीच पात्र असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याची यादी मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्णातील नेमके किती शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ होईल, याबाबत संभ्रम कायम आहे.
संरक्षण राज्यमंत्री नाशकात
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या जिल्ह्णातील ३० शेतकरी जोडप्यांचा बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सत्कार करण्यात येणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्णातील दोन याप्रमाणे ३० शेतकरी दाम्पत्यांना साडी-चोळी तसेच कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे ते कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.



 

Web Title: The calculation continues till the debt ceiling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.