बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:21 AM2018-04-10T00:21:37+5:302018-04-10T00:21:37+5:30
दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून, बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ल्यात केल्याने वासरू ठार झाले आहे.
दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून, बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ल्यात केल्याने वासरू ठार झाले आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी सुनील वाडेकर यांच्या सूचनेनुसार वनरक्षक शरद मोगरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर परिसरात आढळलेल्या ठशांच्या अंदाजावरून बिबट्याचे वय पाच वर्षाच्या आसपास असून, याच्या सोबतीला आजून एक बछडा असल्याचे ठशांवरून आढळले. पिंजऱ्याची मागणीसदरच्या परिसरात आज सेन्सर कॅमेरा लावण्यात आला असून, त्याच्या हालचालीवरून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. दरम्यान, परिसरात बिबट्याचे वास्तव्याच्या खुणा व नुकसान दिसत असल्याने परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.