बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 09:48 PM2020-12-31T21:48:45+5:302021-01-01T00:06:53+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वीच वागदर वस्ती वरती मोटरसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला करुन त्याला जखमी केले होते, ती घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.३१) पुन्हा बिबट्याने वासरू ठार केले.

येथील काकाजी माला वाघ यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. काकाजी वाघ हे रोज प्रमाणे आपल्या गोठ्यात बैल गाय व वासरू बांधून घरात झोपले होते. जेव्हा सकाळी वाघ हे गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना वासरावर बिबट्यांनी हल्ला केल्याचे लक्षात आले. वाघ यांनी सरपंच सुनील माळी यांना ही घटना त्वरीत कळिली. सरपंचांनी डांगसौंदाणे येथील वनरक्षक नवनाथ मोरे व जयप्रकाश शिरसाठ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी जीव मुठीत धरून रात्री पाणी भरत आहे. त्याकरीता बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच सुनील माळी, प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष गणेश काकुळते , आबा अहिरे, मनोज अहिरे, दादा वाघ, आबा वाघ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आता सर्वत्र कांदा लागण चालू आहेत पण लाईटचे या महिन्याचे टाईम टेबल बदलले आहे. दिवसा ७.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत तर रात्री ९.३५ ते सकाळी ७.३५ हि वेळ असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच पिकांना पाणी भरावे लागत आहे सकाळी ७.३५ ला लाईट जाते, म्हणून शेतकरी रात्री पहाटे उठून आपल्या पिकांना पाणी भरत आहेत. एकीकडे बिबट्याचा त्रास तर तर दुसरीकडे रात्रीचा लाईटचा वेळ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.