आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:30+5:302020-12-03T04:27:30+5:30

वडाळीनजीक शिवारातील बाळासाहेब झाल्टे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतमजुरांना आढळून आला. याबाबतची माहिती झाल्टे ...

The calf, which had been separated from its mother, rested again | आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत

आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत

Next

वडाळीनजीक शिवारातील बाळासाहेब झाल्टे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतमजुरांना आढळून आला. याबाबतची माहिती झाल्टे यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी कळविली. भंडारी यांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल होत बछड्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन निफाडच्या रोपवाटिकेत आणले. या ठिकाणी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी बछड्याची पाहणी करून दुरावलेल्या आईसोबत त्याची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना भंडारी यांना केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्याची तपासणी करून तो सुदृढ असल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत रोपवाटिकेत त्याला पाहुणचार देण्यात आला. त्यानंतर नाशिकच्या इको वन्यजीवप्रेमी संस्थेच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात आई आणि बछड्याच्या पुनर्भेटीचा प्रयोग सुरू केला गेला. एका स्टीलच्या जाळीखाली बछड्याला सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्यात आले आणि संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. जाळीला लांब दोरी बांधून ठेवण्यात आली होती. यावेळी ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी ३६०अंशात फिरणारा डिजिटल कॅमेरा त्या दिशेने बसविला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातून बाहेर येत मादीने दर्शन दिले. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मादी आपला बछडा घेऊन गेली. वडाळीनजीक गावात बिबट्याचा बछड्यांसह वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील सर्व नागरिकांना व शेतमजुरांना सतर्क राहत खबरदारीच्या सुचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.

---इन्फो----

...अन‌् मातेचे ममत्व झळकले

मादीने कॅरेटजवळ जाऊन हुंगण्यास सुरुवात केल्यानंतर लांब अंतरावर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी जाळीला बांधलेली दोरी अलगद ओढत जाळी उंचविली. यावेळी बछड्याने बाहेर येऊन मातेला चाटण्याचा प्रयत्न केला; मात्र मादी पुन्हा तेथून शेतात निघून गेली आणि काही मिनिटांत माघारी फिरली आणि पुन्हा जाळीजवळ आली असता जाळी तत्काळ ओढण्यात आल्याने बछडा वेगाने बाहेर पडला. यावेळी मातेने त्याच्या तोंडाला चाटत त्याला जबड्यात धरत पुन्हा शेत गाठले.

--

फोटो आर वर ०२निफाड१/२

Web Title: The calf, which had been separated from its mother, rested again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.