कॅलिफोर्निया असलेला निफाड राज्यात विकासाचे मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:07 PM2019-02-23T18:07:51+5:302019-02-23T18:17:54+5:30
सायखेडा : राज्याच्या राजकारणात कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका खर्या अर्थाने विकासाचे मॉडेल आहे. राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये सर्वाधिक ...
सायखेडा : राज्याच्या राजकारणात कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा निफाड तालुका खर्या अर्थाने विकासाचे मॉडेल आहे. राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये सर्वाधिक निधी निफाडकरांच्या पदरात पडला असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे उपसभापती विजय औटी यांनी केले. चांदोरी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन आण िलोकार्पण कार्यक्र म प्रसंगी आयोजित मेळाव्यात बोलत होते कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते सुरेशबाबा पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे प्रणव पवार, माणकिराव बोरस्ते, जगदीश होळकर, प्रल्हाद कराड, बापू पाटील, भागवत बोरस्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल कदम आपल्या मनोगतात म्हणाले की तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीमुळे रस्त्यांची नेहमीच होणारी चाळण थांबिण्याचे काम हाती घेऊन तालुक्यात सद्या २४८ किलो मीटर रस्त्यांचे उत्कृष्ट कामे सुरु आहेत. प्रत्येक गावात रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य असल्याने करत आहे. शीतल सांगळे, सुरेश बाबा पाटील, बापू पाटील, दत्तात्रय गडाख यांची मनोगते झाली. यावेळी व्यासपीठावर राजेश पाटील, निवृत्ती आहेर, बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाठ, सुधीर कराड, ज्योती वागले, दत्तात्रय गडाख, संजय वाबळे, आदेश सानप, संदीप टर्ले, संदीप गडाख, खंडू बोडके, शिवा सुरासे, धोंडीराम रायते, नरेंद डेर्ले, निलेश दराडे, चिंतामण सोनवणे, सुरेश खैरनार, सुभाष होळकर, राजेंद्र राजोळे, शहाजी राजोळे, सतिष संगमनेरे, शरद कुटे, वैकुंठ पाटील, गोकुळ गीते, बाळासाहेब जाधव, रमेशचंद्र घुगे, यतीन वाघ, भगवान सानप, अरविंद बोरगुडे, तानाजी पुरकर, आशिष मोगल, प्रल्हाद गडाख, अमर आहेर, संजय गाजरे, अष्पाक शेख, भागवत बोरस्ते, शिवनाथ कडभाने यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वा.प्र.)