व्यापाऱ्यांची भगूर बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:12 AM2019-07-18T00:12:46+5:302019-07-18T00:13:23+5:30

भगूर नगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वे लाइन शेजारील मटण मार्केट काढण्यास नगरपालिकेने चालढकल चालविल्याने रेल्वे विभागाला भुयारी बोगद्याचे काम करणे शक्य होत नाही.

 Call of the Bhagwur Bandhi of the traders | व्यापाऱ्यांची भगूर बंदची हाक

व्यापाऱ्यांची भगूर बंदची हाक

Next

भगूर : भगूर नगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वे लाइन शेजारील मटण मार्केट काढण्यास नगरपालिकेने चालढकल चालविल्याने रेल्वे विभागाला भुयारी बोगद्याचे काम करणे शक्य होत नाही. परिणामी भुयारी मार्गाचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, तशी कल्पनाही नगरपालिकेला देण्यात आलेली असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापाऱ्यांनी भगूर बंदची हाक दिली आहे.
भगूरच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तेथील रेल्वे गेट लवकरच बंद होईल. त्यामुळे भगूरच्या व्यापाºयांचे धंदे बंद पडतील. ते होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने भगूर गावात प्रवेश रेल्वे मार्गावर भुयारी बोगद्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी लागणारे तीन कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला सन २०१६ मध्येच अदा केले आहे. परंतु हे काम करण्यासाठी रेल्वे लाइन शेजारील मटण मार्केटचे अतिक्रमण भगूर नगरपालिकेने काढून टाकावे, अशी रेल्वे प्रशासनाची गेल्या सहा महिन्यांपासूनची मागणी आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी भगूर नगर परिषदेशी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र त्या पत्रांना भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी केराची टोपली दाखवली.
दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या आधिकाºयांनी भगूर येथे येऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मुख्याधिकारी गैरहजर होत्या. त्यावेळी बांधकाम अभियंता रमेश कागणे यांनी मुख्याधिकारी व रेल्वेच्या अधिकाºयांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यावेळी दोन दिवसांत मटण मार्केटचे अतिक्रमण काढून न दिल्यास बोगद्याच्या कामासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला परत करून देऊ, असा निर्वाणीचा निरोप नगरपालिकेला देण्यात आला. सदरची बाब भगूर गावातील व्यापारी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांना कळताच त्यांनी एकत्र येत भगूर नगरपालिकेला निवेदन देऊन बुधवारी (दि. १७) मटण मार्केटचे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा गुरुवारी भगूर बंदचा इशारा दिला होता.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ नगरपालिकेत गेले असता तेथेही वाद झाल्याने व्यापाºयांनी शहर बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. निवेदनावर भाजप शहर अध्यक्ष प्रसाद आडके, नीलेश हासे, प्रताप गायकवाड, रमेश शेटे, मधुसूदन गायकवाड, मधुकर कापसे, युनुस शेख, आनाजी कापसे, डॉ. मुत्युंजय कापसे, नीलेश गायकवाड, आदींच्या सह्या आहेत.
भाजप-शिवसेनेची फलकबाजी
व्यापाºयांच्या या बंदमध्ये भाजपने सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना संतापली असून त्यांनीही शहरात फलक लावून बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. भाजप या प्रकरणात राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Web Title:  Call of the Bhagwur Bandhi of the traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.