महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

By admin | Published: May 25, 2015 12:36 AM2015-05-25T00:36:08+5:302015-05-25T00:36:57+5:30

महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

Call center facility for the devotees in the city | महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

Next

विजय मोरे -नाशिक :सिंहस्थ पर्वणीकाळात स्नानासाठी शहरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या मदतीसाठी मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहेत़ मात्र ज्या भाविकांना मोबाइल वा अ‍ॅप्लिकेशन कळत नाही त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे़ यावर महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या पंधरा दिवसांत ते प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असल्याचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले़ सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वणी काळात शहरात बाहेरून येणारे सुमारे ८० लाख, तर शहरातील २० लाख अशी एक कोटी लोकसंख्या प्रशासनाने गृहित धरली आहे़ यावेळी येणाऱ्या भाविकांना माहिती मिळावी यासाठी आतापर्यंत ‘कुंभ लाईव्ह’सारखे चार ते पाच मोबाइल अ‍ॅप्लिेकेशन तयार करण्यात आले आहेत़ मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे अ‍ॅप असून, यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासह संपूर्ण शहराची अद्ययावत माहिती आहे़
उदाहरणार्थ एखादा भाविक दसक घाटावर असेल व त्याला हॉस्पिटल शोधायचे असेल तर अ‍ॅपवर टाकून सर्च केले की त्वरित जवळच्या हॉस्पिटलची यादी फोन नंबर सहित उपलब्ध होते़ तसेच साधुग्राममध्ये असणाऱ्या भाविकाला एटीएम शोधायचे असेल तर त्याचीही माहिती या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहे़ याबरोबरच कुंभमेळा, शहरातील विविध स्थानांचे स्थान महात्म, बसवाहतूक, रेल्वे वाहतूक, वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते यासारखी सर्व प्रकारची माहिती या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहे़ नागरिकांनी ७०३० ३००३०० हा कॉल सेंटरचा क्रमांक येणाऱ्या भाविकांना जास्तीत - जास्त सांगावा़ जेणेकरून भाविकांना हवी ती मदत वा माहिती देणे शक्य होईल़ हे कॉल सेंटर येत्या दहा-पंधरा दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार येणार असून, त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Call center facility for the devotees in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.