धार्मिक संघटनांकडून ‘नाशिक बंद’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:58 AM2017-11-08T00:58:43+5:302017-11-08T00:58:50+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कोणालाही विश्वासात न घेता सर्वेक्षण करून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, सदर मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध धार्मिक संघटनांकडून करण्यात आला. या मोहिमेच्या निषेधार्थ धार्मिक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. ८) ‘नाशिक बंद’ची हाक देण्यात आली आहे.
नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कोणालाही विश्वासात न घेता सर्वेक्षण करून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, सदर मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध धार्मिक संघटनांकडून करण्यात आला. या मोहिमेच्या निषेधार्थ धार्मिक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. ८) ‘नाशिक बंद’ची हाक देण्यात आली आहे.
महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही मंदिरे व दर्ग्यांचा समावेश आहे. या मोहिमेच्या दुसºया टप्प्यास बुधवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मोहिमेच्या पूर्वसंध्येला हिंदू-मुस्लीम धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी जुने नाशिकमधील भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिराजवळ पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा तीव्र निषेध नोंदविला. शहरातील लोकभावना लक्षात घेऊन महापालिक ा प्रशासनाने लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत संबंधितांना विश्वासात घेऊन महापालिकेने फेरसर्वेक्षण करावे तसेच तातडीने सदर मोहीम थांबवावी,