विनायक पांडे यांना ‘मातोश्री’वर पाचारण
By admin | Published: February 4, 2017 01:34 AM2017-02-04T01:34:05+5:302017-02-04T01:34:19+5:30
विनायक पांडे यांना ‘मातोश्री’वर पाचारण
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकाप्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्मच्या गोंधळातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडल्याचा प्रकार कळताच पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी माजी महापौर विनायक पांडे यांना शनिवारी (दि.४) ११ वाजता ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी चांडक सर्कल येथील एका हॉटेलमध्ये शिवसेना उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले जात होते. याची माहिती पांडे समर्थकांना समजताच त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली. यावेळी पांडे आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यात वाद झल्याने बोरस्ते यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती घेतली व पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कळविताच त्यांनी विनायक पांडे यांना शनिवारी मातोश्री येथे बोलाविले आहे. यादरम्यान विनायक पांडे यांच्या मुलाला सेनेने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या पांडे याना उशिरा खासदार हेमंत गोडसे यांनी एबी फॉर्म आणून दिला. मात्र तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्याने त्यांचा ए.बी. फॉर्म स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते. मात्र त्या आधीच ऋतुराज पांडे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे नाकारलेल्या या उमेदवाराला दोन्ही पक्षांची उमेदवारी मिळाली. परंतु अखेर त्यांनी भाजपाकडून अर्ज भरल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)