कोट्यवधीचा महसूल बुडाला : दुसऱ्यादिवशीही टपालसेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:42 PM2019-01-09T17:42:24+5:302019-01-09T17:43:14+5:30

संपामध्ये आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक संपात सहभागी झाले होते

Calls for billions of rupees : post service colaps | कोट्यवधीचा महसूल बुडाला : दुसऱ्यादिवशीही टपालसेवा ठप्प

कोट्यवधीचा महसूल बुडाला : दुसऱ्यादिवशीही टपालसेवा ठप्प

Next
ठळक मुद्देमहापालिका हद्दीतील ३० कार्यालयांमधील दैनंदिन आर्थिक व्यवहार पुर्णत: कोलमडले

नाशिक : टपाल विभागाच्या पोस्टमनसह लिपिकवर्ग दोन दिवसांपासून संपावर गेल्याने शहरासह जिल्ह्याची टपालसेवा सलग दोन दिवस ठप्प राहिली. या संपाचा टपालखात्याला मोठा फटका बसला असून कोट्यवधींच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. बुधवारी (दि.९) टपाल कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
संपामध्ये आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक संपात सहभागी झाले होते. महापालिका हद्दीतील ३० कार्यालयांमधील दैनंदिन टपाल बॅँकींगचे आर्थिक व्यवहार दुसºयादिवशीही पुर्णत: कोलमडले होते. दैनंदिन व्यवहारातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होऊ शकली नाही त्यामुळे या दोन दिवसांत कोट्यवधीचे टपालाचे उत्त्पन्न बुडाले आहे. तसेच रेल्वे मेल सर्व्हीस ठप्प झाल्याने तेथून विविध शहरांमधून नाशिकसाठी आलेल्या टपालाचा बटवडा होऊ शकला नाही. परिणामी मुख्य डाकघरापर्यंत टपालचा पुरवठाच होऊ शकला नाही. परिणामी शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘आरएमएस’मध्ये पडून राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली. या संपात आॅल इंडिया जीडीएस युनियन, भारतीय डाक कर्मचारी महासंघ सहभागी नसल्याने मुख्य डाकघरात २४ कर्मचा-यांनी हजेरी लावली.
शहरातील मुख्य डाकघरामधील सर्व टपालसेवा व दैनंदिन टपाल बॅँकिंगचे आर्थिक व्यवहार कोलमडले होते. या कार्यालयातील सर्वच कर्मचारी वर्ग संपात उतरल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार संपाच्या दुसºया दिवशी बंदच राहिले. एका दिवसात ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल विविध बॅँकींग व्यवहारांमधून होते; मात्र दोन दिवसांपासून सर्वच व्यवहार ठप्प राहिल्याने मुख्य डाकघराचा कोटीचा महसूल बुडाला आहे.

गुरूवारपासून टपालसेवा पुर्ववत
दोन दिवसांचा लाक्षणिक संप बुधवारी संध्याकाळी संपल्यामुळे टपालाचे दैनंदिन व्यवहार व सर्व प्रकारचे कामकाज गुरूवारपासून पुर्ववत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपासून रखडलेली टपालाची विविध कामे मार्गी लागणार आहेत. तसेच टपालाचा बटवडाही पोस्टमनकडून केला जाणार आहे; मात्र दोन दिवसांपासून बटवडा होऊ न शकल्यामुळे अतिरिक्त ताण पोस्टमनवर येणार आहे. यासाठी मुख्य डाकघर, उप डाकघर ते ३० शाखा कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या पोस्टमनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Calls for billions of rupees : post service colaps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.