मातेच्या सुटकेसाठी बछड्यांची पिंजऱ्यासमोर तगमग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:46+5:302021-02-05T05:49:46+5:30

बुधवारी (दि.२७) भल्या पहाटे मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर एक बिबट्या आणि दोन बछड्यांनी सकाळपर्यंत पिंजऱ्यासमोर ठाण मांडल्याची ...

The calves run in front of the cage for the mother's release | मातेच्या सुटकेसाठी बछड्यांची पिंजऱ्यासमोर तगमग

मातेच्या सुटकेसाठी बछड्यांची पिंजऱ्यासमोर तगमग

Next

बुधवारी (दि.२७) भल्या पहाटे मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर एक बिबट्या आणि दोन बछड्यांनी सकाळपर्यंत पिंजऱ्यासमोर ठाण मांडल्याची घटना घडली. मातेच्या सुटकेसाठीची बछड्यांची तगमग सकाळी घटनास्थळी शेतकरी येईपर्यंत सुरू होती. शेतकरी आल्यानंतर मुक्त असलेल्या बिबट्या व बछड्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर एक बिबट्या आणि दोन बछड्यांचा मुक्त वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. उजनी शिवारात गेल्या आठवड्यात बिबट्याने वत्सलाबाई सोपान जाधव यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करून पाच शेळ्यांचा फडशा पाडला होता. त्यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वीही बिबट्याने एका शेळीला ओढून नेले होते. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जानेवारी रोजी जाधव यांच्या शेताजवळच पिंजरा लावून त्यात शेळी ठेवण्यात आली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात सुमारे साडेचार वर्षे वयाचा मादी बिबट्या जेरबंद झाला.

इन्फो

बिबट्याला सुरतक्षितस्थळी हलविले

सकाळी सहा वाजेच्या सुमारास बाळासाहेब साबळे व गणेश दवंगे हे मका कापणीसाठी शेताकडे गेल्यानंतर त्यांना पिंजऱ्याच्या बाहेर एक बिबट्या व दोन बछडे बसलेले दिसले. या दोघांना पाहिल्यानंतर बिबट्या आणि दोन बछडे पळून गेले. साबळे यांनी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती आसपासच्या शेतकऱ्यांना दिली. पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्या आणि दोन बछडे पिंजऱ्याबाहेर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे मधुकर शिंदे, वत्सला कांगणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यातील बिबट्या सुरक्षित स्थळी वनविभागाच्या खात्याकडे हलविला.

कोट...

मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर आणखी एक बिबट्या आणि दोन बछडे या भागात असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात गुरुवारी पिंजरा लावण्यात येणार आहे.

- अनिल साळवे, वनपरिमंडळ अधिकारी

फोटो- २७ उजनी

सिन्नर तालुक्यातील उजनी शिवारात पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.

===Photopath===

270121\27nsk_35_27012021_13.jpg

===Caption===

फोटो- २७ उजनी  सिन्नर तालुक्यातील उजनी शिवारात पिंजऱ्यात जेरबंद झालेला  बिबट्या.  

Web Title: The calves run in front of the cage for the mother's release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.