पाटोळेत ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्यावतीने शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:02 PM2020-03-08T18:02:41+5:302020-03-08T18:03:05+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्यावतीने सुकन्या योजनेसह विविध प्रकारच्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यात आला. यावेळी पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक आर. डी. तायडे, सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील, वरीष्ठ व्यवस्थापक राजेंद्र आघाव सहाय्यक पोस्टमास्तर बाळासाहेब कराड, सरपंच मेघराज आव्हाड, माजी सरपंच सोपान खताळे आदी उपस्थित होते.
यावेळी मोफत आधार कार्ड नोंदणी तसेच दुरूस्ती शिबिर घेण्यात आले. त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच पोस्ट विभागाच्यावतीने विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. पोस्ट विभागातर्फे शासनाच्यावतीने ग्रामीण जनतेसाठी विविध योजना राबवणे चालू केले आहे यामुळे ग्रामीण जनतेला शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा आदी योजना राबविल्या जात असल्याचे तायडे यांनी सांगितले. ग्रामीण टपाल जीवन विमा त्याचप्रमाणे दैनंदिन आर्थिक व्यवहार या पोस्ट विभागात सहज सुलभ करता येतात हे समजावून सांगितले. कोणत्याही बँकेत ग्रामस्थांचे खाते असले तरी त्यांना वेळ प्रसंगी अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा स्वत:च्या गावात आपल्या पोस्ट आॅफिस मधून पैसे काढता येणार आहे. शासनाकडून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासारख्या शासनाकडून मिळणारी आर्थीक मदत त्यांना आता गावातच मिळणार आहे. यावेळी सोमेश बोरकर, राहुल शिंपी, विठ्ठल पोटे, निलेश कुलथे उपस्थित होते.