कॅम्प बंधारा-द्याने रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:50 PM2017-08-20T22:50:32+5:302017-08-21T00:22:47+5:30
द्याने गावाचा मालेगाव महापालिकेमध्ये समावेश होऊनही परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. द्याने ते मालेगाव कॅम्पकडे जाणारा मुख्य रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संगमेश्वर : द्याने गावाचा मालेगाव महापालिकेमध्ये समावेश होऊनही परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. द्याने ते मालेगाव कॅम्पकडे जाणारा मुख्य रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. द्याने भागात प्लॅस्टिक उद्योगांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या कारखान्यात काम करणारे मजूर प्रामुख्याने कॅम्प, भायगावकडून येतात. तसेच द्याने, वडगाव परिसरातील शेतकरी बांधव, विद्यार्थी मालेगावकडे विविध कामांसाठी कॅम्प बंधारा ते द्याने पाण्याच्या टाकीकडे जाणाºया रस्त्यांचा वापर करतात. हा १ ते १५ कि.मी. अंतराचा रस्ता अत्यंत खराब आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºया वाहनचालकांना कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते आहे. पावसाळ्यात तर अधिकच दैना होते. वास्तविक गेल्या सहा वर्षांपासून द्याने ग्रामपंचायतीचा मालेगाव महापालिकेत समावेश झाला आहे. असे असूनही या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी वा महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याबाबत नागरिकांकडून खेद व्यक्त केला जात आहे. नगरसेवकांची दुसरी टर्म सुरू झाली आहे. आता तरी या रस्त्याचा वनवास संपवून गरीब मजूर, कामगार, शेतकरी, विद्यार्थी वर्गाचा प्रवास सुखकर करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.