छावणी परिषद मतदार यादीतून १९ हजार नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:25+5:302021-07-07T04:18:25+5:30

छावणी परिषद निवणूक कायदा व देशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा तसेच लोकसभा, विधानसभा यांच्यासाठी असलेला निवडणूक कायदा वेगवेगळे आहेत. ...

Camp Council omitted 19,000 names from the voter list | छावणी परिषद मतदार यादीतून १९ हजार नावे वगळली

छावणी परिषद मतदार यादीतून १९ हजार नावे वगळली

Next

छावणी परिषद निवणूक कायदा व देशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा तसेच लोकसभा, विधानसभा यांच्यासाठी असलेला निवडणूक कायदा वेगवेगळे आहेत. १९२४ मध्ये छावणी परिषद कायदा तर १९४५ मध्ये छावणी परिषद निवडणूक कायदा अस्तित्वात आला. त्यात २००७ मध्ये दुरुस्ती करण्यात आली व सध्या याच कायद्याच्या चौकटीत देशभरात छावणी परिषदेची निवडणूक घेतली जाते. यातील तरतुदीनुसार प्रतिवर्षी जूनमध्ये मतदार नोंदणी करून १ जुलै रोजी यादी प्रसिद्ध केली जाते. तसेच २० जुलै पर्यंत जाहीर झालेल्या यादीवर हरकत घेणे, नावे नव्याने टाकणे ही प्रकिया राबविण्यात येऊन त्या नंतर बोर्ड अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हरकतींवर सुनावणी होऊन १५ सप्टेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येते. २०१४ मध्ये झालेल्या देवळाली छावणी परिषद निवडणुकीसाठी सर्व आठ वॉर्डमध्ये एकूण मतदार संख्या ३८,२८० होती. ७ वर्षांनी त्यात भर पडणे आवश्यक असताना, त्यात घट होऊन ती सर्व आठ वॉर्डांसाठी १९२२८ झाली असल्याने तब्बल १९०५२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

चौकट===

मतदारांची नावे कमी होण्यामागे सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे ज्या नागरिकांचा घर बांधणीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला नाही त्यांची नावे यंदा वगळण्यात आली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका वॉर्ड क्रमांक ७ ला बसला आहे. २०१४ मध्ये या वाॅर्डातील मतदार संख्या ७०५० होती. आता ती ३३४ झाली आहे, तर वॉर्ड क्रं ३ मध्ये २०१४ मध्ये ३६९६ असलेली संख्या ३८४२ झाली आहे. निवडणूक केव्हा होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. प्रशासनाने मात्र कायद्याच्या चौकटीत मतदार यादी बनवून निवणुकीची तयारी सुरू केली आहे.

चौकट===

वॉर्डनिहाय पूर्वीचे व आताचे मतदार

१ वॉर्ड ५२८२ - २०२६

२ वॉर्ड २९६३ - २०२०

३ वॉर्ड ३६९६ - ३८४२

४ वाॅर्ड ४६४७ - २३७१

५ वॉर्ड ३४६१ - १६३७

६ वॉर्ड ४६३५ - १७४७

७ वॉर्ड ७०५० - ३३४

८ वॉर्ड ५९४६ - ५२११

--------------

Web Title: Camp Council omitted 19,000 names from the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.