नामपूर महाविद्यालयाचे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:17 PM2020-01-09T23:17:45+5:302020-01-09T23:18:11+5:30
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालय नामपूरचे रासेयो विभाग व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रावळगाव यांच्या संयुक्क्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे अंबासन येथे विविध उपक्रम राबवित पार पडले.
नामपूर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालय नामपूरचे रासेयो विभाग व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रावळगाव यांच्या संयुक्क्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे अंबासन येथे विविध उपक्रम राबवित पार पडले.
समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जडण-घडण ही राष्ट्रीय सेवा योजनेमुळे होत असून, रासेयो ही खऱ्या अर्थाने समाज विकासाची चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान डोंगरावरील परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यासाठी सदर ठिकाणी ठिबक सिंचन व्यवस्था केली गेली असून, लवकरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी प्राचार्य अरुण येवले, उपप्राचार्य डॉ. एम. डी. आहिरे, प्रा. गौतम निकम यांचे मार्गदर्शन तर डॉ. हर्षल भामरे, डॉ. श्वेता आहिरे, प्रा. डॉ. व्ही. आर. निकम, डॉ. एस. टी. शेलार, प्रा. आर. पी. ठाकरे, मयूर भदाणे, प्रा. अमित सोनवणे, प्रा. डॉ. बी. एम. सोनवणे, स्वप्नील कोळी, प्रशांत सोनवणे या मान्यवरांचे मार्गदर्शन स्वयंसेवकांना लाभले. शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांचे विविध गट करण्यात आले. प्रत्येक गटाला थोर पुरुषांची नावे देत प्रत्येक गटातील एका स्वयंसेवकास संघनायक म्हणून नेमणूक केली होती. शिबिरादरम्यान स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाºया मयूर खैरनार, गायत्री आहिरे, भावना पाटील मीनाक्षी ठाकरे, अजहर पिंजारी, नीलेश पवार, दुर्गेश वाघ, रोहित मोकासरे, वैशाली घरटे, वैशाली धोंडगे, योगीता आहिरे, किरण धोंडगे या स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियान
शिबिरांतर्गत समपातळी समचर, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, ग्रामस्वच्छता अभियान, रस्ते सुरक्षा अभियान, प्लॅस्टिकमुक्त गाव, गाव सर्वेक्षण, व्यसनमुक्ती संदेश, ग्रामस्वच्छता अभियान, प्रभात फेरी, जन जागृतीसाठी पथनाट्यासारखे विविध उपक्र म राबविले गेले. तसेच विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गावाजवळील दोन्ही डोंगरावर दगडी बांध घालणे, पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्र मांतर्गत सम पातळी समचर हे खोदल कार्यक्रम पार पडले.