डाळिंब उत्पादकांसाठी वावीत शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:09 PM2018-11-17T18:09:21+5:302018-11-17T18:09:44+5:30
सिन्नर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) वावी येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
वावी : सिन्नर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) वावी येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांसाठी डाळिंब पिकाचे व्यवस्थापन, कीड व तेल्यारोग नियंत्रण, प्रक्रि या उद्योग व निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन व निर्यात प्रक्रि या यासंबंधी तज्ज्ञाांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. चार टप्प्यात दिवसभर ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
लखमापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन हिरे, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. वाळुंज, कृषी प्रक्रि या शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, डाळिंब उत्पादन तज्ज्ञ प्रमोद देशमुख यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत.
उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या मार्गदर्शन मेळाव्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकºयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र दोडके यांनी केले आहे.