नाशिक जिल्ह्यात मद्यतस्करांच्या विरोधात मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 03:12 PM2018-01-13T15:12:14+5:302018-01-13T15:14:47+5:30
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकामार्फत नाशिाक जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने आणण्यात येणा-या दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशातील निर्मित मद्य वाहतुकीविरूद्ध मेहिम उघडण्यात आली आहे. त्यासाठी काही प्रमुख मार्गावर
नाशिक : पर राज्यातून बेकायदेशीरपणे अवैध दारूची आयात करणा-या मद्यतस्करांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहिम सुरूच असून, नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंबोली तसेच चांदवड-लासलगाव रस्त्यावर दोन ठिकाणी सापळा रचून देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणा-या दोन वाहने ताब्यात घेवून त्यातील लाखोंचा माल जप्त करण्यात येवून दोघा मद्यतस्करांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकामार्फत नाशिाक जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने आणण्यात येणा-या दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशातील निर्मित मद्य वाहतुकीविरूद्ध मेहिम उघडण्यात आली आहे. त्यासाठी काही प्रमुख मार्गावर नाकाबंदी व तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर नजिकच्या आंबोली येथे संशयावरून राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिका-यांनी मारूती व्हॅगनर या कारची तपासणी केली असता त्यात दोन लाख १० हजाराचे विदेशी मद्य दडविलेले सापडले. या मद्याची वाहतूक करणा-या गोविंद भोर रा. नाशिक या मद्यतस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे. असाच प्रकार चांदवड-लासलगाव रस्त्यावरील संशयावरून झडती घेतलेल्या टोयाटो इनोव्हा कारमधून देशीदारूची विना परवाना वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. कारचालक सुर्यभान जगताप याला ताब्यात घेण्यात आले असून, कारसह साडेअकरा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई उप अधीक्षक गणेश बारगजे, निरीक्षक एस. डी. चोपडेकर, उत्तम आव्हाड तसेच विलास बामणे, हवालदार महेंद्र बोरसे, चव्हाणके, श्याम पानसरे, धनराज पवार आदींनी पार पाडली आहे.