अनधिकृत नळजोडणीविरुद्ध मोहीम ठप्प

By admin | Published: May 11, 2017 02:04 AM2017-05-11T02:04:35+5:302017-05-11T02:04:47+5:30

इंदिरानगर : वडाळागाव व पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी आणि जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी उपसणाऱ्यांविरुद्धची मोहीम थंडावली आहे.

The campaign against unauthorized tuition jam | अनधिकृत नळजोडणीविरुद्ध मोहीम ठप्प

अनधिकृत नळजोडणीविरुद्ध मोहीम ठप्प

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : वडाळागाव व पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी आणि जलवाहिनीस सर्रास विद्युत मोटारी लावून पाणी उपसणाऱ्यांविरुद्धची धडक मोहीम थंडावली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची पाणीचोरी आणि कृत्रिम पाणीटंचाई सुरूच असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या तीस वर्षांपासून वडाळागाव विकसित झालेले आहे. त्यापूर्वी हा संपूर्ण भाग शेतीमय होता. या भागात द्राक्ष व गुलाबाचे उत्पादन घेतले जायचे. परंतु जमिनीस भाव मिळत गेला तसतशी शेतकऱ्यांनी शेतजमीन विकायला सुरुवात केली. याठिकाणी कौलारू घरे आणि रहिवासी वसाहती तयार झाल्या. मेहबूबनगर, गुलशननगरसह परिसरात बहुतेक हातावर काम करून पोट भरणारे लोक आहेत.
यामध्ये बहुतेक रहिवाशांनी मनपा विभागाची कोणतीही परवानगी न घेता प्लंबरद्वारे अनधिकृतरीत्या नळजोडणी करून घेतली आहे. तसेच जलवाहिनीतून सर्रास विद्युत मोटारींद्वारे पाणी खेचण्याचा सपाटा लावला आहे.
वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीेटंचाई असून काही भागात चक्क गटारीचे पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The campaign against unauthorized tuition jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.