वाहनधारकांविरोधात मोहीम
By admin | Published: May 25, 2016 11:24 PM2016-05-25T23:24:08+5:302016-05-25T23:24:43+5:30
वाहनधारकांविरोधात मोहीम
मालेगाव : येथील कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंह यांनी ंवाहनचालकांविरोधात मोहीम उघडत सुमारे ७० वाहने ताब्यात घेतली आहेत.
रोकडोबा फाटा येथे झालेल्या अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने चालविणे या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उठू लागल्याने कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी भालसिंह यांनी आज सकाळी भायगाव रोडवर वाहन तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत विनानंबर प्लेट, विनापरवाना प्रवासी, कागदपत्रे तपासण्यात येऊन ७० पेक्षा जास्त वाहने ताब्यात घेण्यात आली. यात दहा रिक्षा, आठ प्रवासी वाहतुकीच्या गाड्या, ५० दुचाकी आदिंचा समावेश आहे. या सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.. कॅम्प पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेचे स्वागत करण्यात येत असून, ही मोहीम शाळा व महाविद्यालय तसेच खासगी क्लासेस परिसरात राबविण्याची मागणी होत आहे.