पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी प्रचारफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:27 PM2018-09-07T17:27:29+5:302018-09-07T17:27:40+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पोषण अभियान कार्यक्रमानिमित्त गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींना मार्गदर्शन करून पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी गावातून फेरी काढण्यात आली.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या पोषण अभियान कार्यक्रमानिमित्त गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींना मार्गदर्शन करून पोषण आहार अभियानाचा प्रचार करण्यासाठी गावातून फेरी काढण्यात आली. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर व इगतपुरीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परदेशी, विक्र मराजे यांनी सहभाग घेतला होता.
टाकेद बुद्रुक येथील अंगणवाडी व ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या अभियानात बालकांचे वजन, उंची, दंडघेर आदीची तपासणी करण्यात आली. पोषण आहार प्रात्यक्षिक प्रदर्शनास भेट देणाऱ्या मातांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले.
वंदना सोनवणे यांनी गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन युवतींचे वजन व उंची घेऊन माहिती दिली. हे अभियान घराघरांत पोहोचविण्यााबाबत सांगितले. अभियान जनजागृतीसाठी गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. फेरीत माधुरी खोल्लम, बबाबाई जाधव, आर. आर. इंगळे, पूर्वा दातरंगे, अनिता गायकवाड, ताराबाई परदेशी, सुनीता जाधव, रीता परदेशी, सीता साबळे, बसवंता वारघडे, सुनीता भांगे, अनिता खामकर आदी उपस्थित होत्या.
फोटो.
सर्वतीर्थ टाकेद येथे पोषण आहार अभियान जगजागृतीसाठी काढण्यात आलेली प्रचारफेरी. (०७टाकेदरॅली)