चांदवडला डेंग्यू साथीच्या आजारांवर जनजागृत्ती मोहीम
By admin | Published: September 30, 2016 01:13 AM2016-09-30T01:13:34+5:302016-09-30T01:19:07+5:30
चांदवडला डेंग्यू साथीच्या आजारांवर जनजागृत्ती मोहीम
चांदवड : नगर परिषदेच्या वतीने सध्या चांदवड शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या या साथीच्या आजाराने थैमान घातले असून, त्यादृष्टीने नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सर्व नगरसेवक व कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागामध्ये ठिकठिकाणी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली
आहे.
प्रभाग क्र. १० मध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता विलास पवार यांनी सदर प्रभागात घरोघरी जाऊन आजाराबाबत माहिती दिली. तसेच प्रभाग क्र. तीनमध्ये नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष कविता उगले, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते जगन्नाथ राऊत, डॉ. प्रदीप जायभावे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप पाटील, के. डी. जाधव, डॉ. ठाकरे, सुरेश जाधव, महेश बोराडे, अंकुर कासलीवाल, गणेश पारवे, अमोल बिरारी, गणेश खैरनार, आशा स्वंयसेविका, चांदवड शहरातील नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी संजय गुरव, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)