पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:16 AM2019-09-17T01:16:26+5:302019-09-17T01:16:46+5:30

‘उड्डाणपुलाखाली थाटला व्यवसाय’ या लोकमत वृत्ताची दखल घेत पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून गजरे विक्रेत्यांना हटविले. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 Campaign to eradicate encroachment on behalf of the Eastern Region | पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम

पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम

Next

प्रभाव  लोकमतचा

इंदिरानगर : ‘उड्डाणपुलाखाली थाटला व्यवसाय’ या लोकमत वृत्ताची दखल घेत पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून गजरे विक्रेत्यांना हटविले. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली किरकोळ विक्रे त्यांचे अतिक्रमण कायम लोखंडी ग्रील लावून सुद्धा पुन्हा गजरे विक्रे त्यांनी तेरा लावल्याने परिसरात बकाल स्वरूप प्राप्त झाले. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक द्वारका सर्कल भाभानगर आणि पाथर्डी फाटाकडून असे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते उड्डाणपुलाखाली गजरेविक्रेत्यांनी अतिक्र मण केले आहे, गजरे विकून ते उदरनिर्वाह करत असली तरी त्यांनी पुलाखाली डेरा टाकला आहे, तसेच आंघोळ, स्वयंपाक, झोप आधी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपण वाढला आहे.
मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरेविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या वतीने अनेक वेळेस अतिक्र मण निर्मूलन मोहीम राबवून कारवाई केली उड्डाणपुलाखाली गजरेविक्रे ते हटवावे म्हणून लोखंडी ग्रील लावली तरी आतमध्ये ते आपला डेरा लावतात. त्यामुळे परिस्थिती जसे तेच होत आहे याची दखल घेत सोमवारी (दि.१६) पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्र मण विभागाचे शिवाजी काळे व दहा कर्मचाऱ्यांनी अतिक्र मण निर्मूलन मोहीम राबवून मुंबई नाका येथील गजरेविक्रे ते हटवले. यामुळे उड्डाणपुलाखालील जागा रिकामी झाली असून, वाहनचालकांना संभाव्य अपघात टळणार आहे.

Web Title:  Campaign to eradicate encroachment on behalf of the Eastern Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.