पेठ तालुक्यात ‘गलोल हटवा, पक्षी वाचवा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:36+5:302021-06-16T04:18:36+5:30
प्रादेशिक पश्चिम वन विभागाचे उपसंरक्षक आनंद रेड्डी यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आड बु. येथे या ...
प्रादेशिक पश्चिम वन विभागाचे उपसंरक्षक आनंद रेड्डी यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आड बु. येथे या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
वनपरिक्षेत्र आंबे अंतर्गत गावामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावागावात भेटी देऊन गलोल वापरणाऱ्या शिकारी व लहान मुलांचे प्रबोधन केले. ‘गलोल द्या, बक्षीस घ्या’ या संकल्पनेतून गलोल जमा करणाऱ्या मुलांना बक्षिसे वाटप करण्यात आली. तसेच भविष्यात गलोल वापरणार नाही व पक्ष्यांची शिकार करणार नाही, अशी प्रतिज्ञाही बालकांनी घेतली.
याप्रसंगी आंबे वनपरिक्षेत्राचे वनपाल उत्तम बागुल, वनरक्षक जयश्री चौधरी, किरण दळवी, राजकुमार पवार, सरपंच हिरा जांजर, पोलीस पाटील, योगेश गायकवाड, ग्रा.पं. सदस्य गोपाळ गायकवाड, नामदेव गायकवाड, गणपत गायकवाड, यशवंत पवार, ग्रामविकास अधिकारी सचिन नेहेते, शरद पवार यांच्यासह ग्रामस्थ, युवावर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
फोटो
- १४ पेठ गलोल
पेठ तालुक्यातील आंबे येथे ‘गलोल द्या, बक्षीस घ्या’ अंतर्गत मुलांना साहित्य वाटप करताना वनविभागाचे कर्मचारी.
===Photopath===
140621\14nsk_11_14062021_13.jpg
===Caption===
पेठ तालुक्यातील आंबे येथे गलोर द्या, बक्षिस घ्या अंतर्गत मुलांना साहित्य वाटप करतांना वन विभागाचे कर्मचारी.