येवल्यात पोलिस-पालिका प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:50 PM2020-09-30T18:50:29+5:302020-09-30T18:51:28+5:30

येवला : शहरातील वाढत्या कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस व पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पालिकेने ८३ हजार शंभर रूपये वसुल केले असून पोलिस प्रशासनाने लाखो रूपये वसुल केले आहे.

Campaign of police administration in Yeola | येवल्यात पोलिस-पालिका प्रशासनाची मोहीम

येवल्यात पोलिस-पालिका प्रशासनाची मोहीम

Next
ठळक मुद्देकोरोना : दंडात्मक कारवाईतून लाखो रुपयांची वसुली

येवला : शहरातील वाढत्या कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस व पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पालिकेने ८३ हजार शंभर रूपये वसुल केले असून पोलिस प्रशासनाने लाखो रूपये वसुल केले आहे.
शहर पोलिस व नगरपालिकेच्या वतीने विनामास्क, सोशल डिस्टंसिंग, निर्धारीत वेळेपेक्षा जास्तवेळ दुकाने सुरू ठेवणे आदींबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. याबरोबरच शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरीक विनामास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर न करता वावरत असल्याने पालिका व पोलिस प्रशासनाने सदर मोहीम सुरू केली आहे.
नगरपालिकेच्या पथकाने या मोहीमेत २९४ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ८३ हजार १०० रूपये वसुल केले आहेत. कोरोनाकाळात पोलिस वाहतुक शाखेकडून एक लाख ८२ हजार तर लोकांकडून दोन लाख ३६ हजार ८०० तर न्यायालयाच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख रूपये दंड वसुल केला गेला आहे.
येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे, युवराज चव्हाण, पोलिस हवालदार विजय पैठणकर, पोलिस नाईक दिलीप शिंदे, पोलिस शिपाई सागर वाघावकर, पोलिस कर्मचारी तर पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अधिकारी प्रविणकुमार पाटील, सागर झावरे, पवन परदेशी, प्रतीक उंबरे, सुनील जाधव आदी पालिका कर्मचारी मोहीम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.


 

Web Title: Campaign of police administration in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.