पाथरे येथे हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 05:54 PM2019-02-03T17:54:00+5:302019-02-03T17:54:17+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढणारे अपघात लक्षात घेता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीचे केले आहे.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढणारे अपघात लक्षात घेता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीचे केले आहे. त्यासाठी पाथरे येथे लोक जनशक्ती पार्टी, पाथरे वर्कर ग्रुप आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली.
दुचाकीहून प्रवास करतांना हेल्मेट न घातल्याने आपला जीव धोक्यात घालतो. डोक्याला मार लागून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हेल्मेट आपली सुरक्षितता वाढवतो, त्यासाठी ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती करण्यात आली असल्याचे वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी सांगितले. दुचाकीचालकांनी वाहने चालविताना हेल्मेट घालावे तसेच अपघातग्रस्तांना वेळीच उपचार आणि मदत करावी असे आवाहन केले. यावेळी तरूणांनी पोलीस कर्मचाºयांबरोबर हेल्मेट घालून दुचाकीवरून गावात फेर फटका मारला जेणेकरून या मोहिमेचा उद्देश सर्वांपर्यंत पोहचावा. गावात ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे.