कळवणला किसान सभेचा विजयी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:39 AM2018-04-03T01:39:28+5:302018-04-03T01:39:28+5:30
तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले.
कळवण : तालुक्यातील धरणात असलेल्या पाण्याचा हक्क तालुक्यासाठी नगण्य राहिल्याने नार-पार-दमणगंगा -पिंजाळ या पश्चिमवाहिन्या नद्यांचे पाणी अडवून गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळवून एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ न देता संपूर्ण पाणी कळवण व उर्वरित पाणी इतर तालुक्यांना दिले जाईल. तसेच शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव व जुने कर्ज असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शासनाशी आपला लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन आमदार जे. पी. गावित यांनी केले. कळवण येथील कै. का. ज. पाटील चौकात महाराष्ट्र किसान सभा व कळवण तालुक्याच्या वतीने विजयी मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शांताराम जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे आमदार भाई जयंत पाटील, सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सीटू संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सुरगाणा पंचायत समितीचे इंद्रजित गावित, काँग्रेसचे शैलेश पवार, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, तालुका सेक्रेटरी हेमंत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गावित यांनी, संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळाने योजनेसाठी लागणारे वयाचे दाखले प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयांना अधिकार देण्याचे शासनाने मान्य केले आहे. याबरोबरच मुंबई येथे मंजूर झालेल्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
आमदार भाई जयंत पाटील म्हणाले, नाशिक ते मुंबई पायी लॉग मार्च काढून यशस्वी करणे खरोखरच अशक्य बाब होती. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने मी धन्य झालो. आगामी काळातही मला केव्हाही हाक मारा मी तुमच्या मदतीसाठी तयार राहील, असे आश्वासन पाटील यांनी दिले. हेमंत पाटील यांनी प्रस्तावित केले़ दरम्यान सोमवारी दुपारी १ वाजता मानूर येथील पोस्ट बेसिक आश्रमशाळेपासून विजयी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पावरी, डफ, ढोल-ताशांच्या गजरात थिरकत आदिवासी शेतकरीबांधवांनी आनंद साजरा केला.मिरवणूक व्यापारी पेठेतून सभास्थानी दुपारी २ वाजता पोहचले. मिरवणुक दरम्यान एक रु ग्णवाहिका नाशिकच्या दिशेने जात असताना नागरिकांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून दिली. विजयी सभा जवळपास सहा तास सुरु होती. सभेठिकाणी बसण्यास जागा कमी पडल्याने शेतकºयांनी कळवणच्या मेनरोडवर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडून सभा ऐकली. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.