कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:40 PM2018-12-27T18:40:23+5:302018-12-27T18:40:36+5:30
सिन्नर : कडवा कालव्यातून पाण्याची गळती होणारे पाणी तालुक्यातील विंचूर दळवी येथील भांगरे मळा परिसरात पिके पाण्याखाली जावून शेतकºयांचे नुकसान झाले आहे.
सिन्नर : कडवा कालव्यातून पाण्याची गळती होणारे पाणी तालुक्यातील विंचूर दळवी येथील भांगरे मळा परिसरात पिके पाण्याखाली जावून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कालव्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहेत.
कडवा कालव्याच्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामूळे विंचूर परिसरात कालव्यालगतच्या शेतांमध्ये गळती होणारे पाणी साचून शेतीपिांचे नुकसान होत आहे. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने गळती होणारे पाणी शेतात साचून गहू, मका, गाजर आदी पिके सडली आहेत. भांगरे मळ्यातील बाबुराव भांगरे यांच्या शेताच्या लगत कालवा गेला आहे. त्यातून होणाºया पाण्याच्या गळतीमुळे महिनाभरापूर्वी पेरणी केलेला गहू शेतात पाणी साचून सडून गेला आहे. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी प्रभावी कामे करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.