ओझर येथे कॅनरा बँकेचे एटीएम फोडले, चोरटे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2023 03:43 PM2023-04-09T15:43:50+5:302023-04-09T15:44:23+5:30

चोरीच्या घटनांमध्ये होतेय वाढ

canara bank atm smashed at ozar thieves absconding | ओझर येथे कॅनरा बँकेचे एटीएम फोडले, चोरटे फरार

ओझर येथे कॅनरा बँकेचे एटीएम फोडले, चोरटे फरार

googlenewsNext

सुदर्शन सारडा, ओझर (जि नाशिक): येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यान फोडले.  सदरची घटना अशी की ओझर हून नाशिक कडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे आणि त्याला लागून एटीएम देखील आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले. आधी एक जण आत शिरला आणि काही वेळाने बाहेरची परिस्थिती सुमसामा पाहून दुसऱ्याने आत प्रवेश केला.त्यांनी हातातील लोखंडी वस्तूच्या आधारे मुख्य दार फोडले. परंतु बँकेंना फोन लोगोपाट तीन दिवस सुट्ट्या असल्याने मशीन मध्ये रक्कम सापडून आली नाही.

दरम्यान सकाळच्या सत्रात एक ग्राहक जेव्हा पैसे काढायला गेला तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर स्थानिक जागा मालकांनी बँकेच्या व्यवथापकांना संपर्क केला. त्यानंतर सबंधित अधिकारी आल्यानंतर पोलिसांनी इतर बाबी तपासल्या त्यात सीसीटिव्ही फुटेज देखील तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी उशिरा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. दरम्यान लोकमत ने स्थानिक प्रबंधक तृषिता आचार्य यांच्याशी अधिक माहिती घेतली असता त्यांनी  मशीनचे मोठे नुकसान झाले असून बँक एटीएम मध्ये किती रक्कम होती आणि मधल्याकळत किती रक्कम काढली गेली याचा तपशील लवकरच मिळेल असे सांगितले. ओझर पोलिसांनी सदरचा परिसर सिल केला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: canara bank atm smashed at ozar thieves absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.