मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 05:26 PM2019-07-02T17:26:05+5:302019-07-02T17:29:38+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत.

Canceled on Nashik Road in Mumbai; Passengers' journey is lost | मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

Next
ठळक मुद्देपंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली.मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली

नाशिक : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने कसाºयापासून पुढे रेल्वेरू ळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच मध्यरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत हळुहळु रेल्वे वाहतूक ‘रूळा’वर येईल, असे प्रशासनाने सांगितले.
दररोज नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. सोमवारी रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली. तसेच जनता व कृषीनगर एक्सप्रेस मुंबईवरून पुन्हा नाशिकपर्यंत सुरळीत आली. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबईला जाणाºया चाकरमान्यांचे प्रमाण सुटीमुळे नव्हते. दुस-या राज्यातून आलेल्या प्रवाशांचा मात्र नाशिकपासून मुंबईचा पुढील प्रवास खोळंबला. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत रेल्वेस्थानकार प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेगाड्यांच्या चौकशीचा भडीमार केंद्रावर दिसून आला. यावेळी चौकशी अधिकारी आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडाले. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली. बहुतांश रेल्वेगाड्या साईडट्रॅकला करण्यात आल्या होत्या. काही रेल्वेगाड्या स्थानकाबाहेर उभ्या केल्या गेल्याने प्रवाशांचे हाल झाले.
 

Web Title: Canceled on Nashik Road in Mumbai; Passengers' journey is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.