बाजार समित्यांवरील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 05:59 PM2020-02-05T17:59:21+5:302020-02-05T17:59:36+5:30
लासलगाव: महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि.१३ आॅगस्ट २०१५ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या राज्यपालांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत.
लासलगाव: महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि.१३ आॅगस्ट २०१५ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या राज्यपालांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यपाल भगतिसंह कोशारी यांनी त्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. १३ आॅगस्ट २०१५ रोजी परिपत्रक काढून कृषि, कृषी प्रक्रि या, कृषी पणन, कायदा आणि अर्थशास्त्र किंवा वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ संचालक नियुत केले होते. महाराष्ट्रात पाच कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्या बाजार समितीत चार तर पाच कोटी पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समितीत दोन तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यात आले होते.
या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेची सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने या नियुक्त्या रद्द करीत शासनाला विशेष निमंत्रित यांच्या नियुक्ती बाबत सर्वसमावेश मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.