नगरसेवकांच्या दबावतंत्रामुळे ऐनवेळी उमेदवारी ‘रद्द’
By admin | Published: February 4, 2017 01:25 AM2017-02-04T01:25:06+5:302017-02-04T01:25:20+5:30
नगरसेवकांच्या दबावतंत्रामुळे ऐनवेळी उमेदवारी ‘रद्द’
नाशिक : शिवसेनेत उमेदवारीवरून राडा झाला, तर भाजपात अनेक निष्ठावंतांना डावलल्या गेल्यामुळे भाजपातही अंतर्गत खदखद वाढल्याची चर्चा आहे. प्रभाग एक व सहामधील नाट्यमय घडामोडी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत घडत होत्या. त्यातून भाजपाच्या यादीत खाडाखोड झाल्याचा आरोप इच्छुकांनी केला, तर प्रभाग ७ मधून भाजपाच्या दोघा इच्छुकांनी तत्काळ शिवबंधन बांधत उमेदवारी पदरात पाडून घेतली.
भाजपाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रभाग एकमधून आधी पूनम धनगर, रंजना भानसी, अमित घुगे व अरुण पवार यांचे नाव निश्चित करण्यात येऊन तसे ए.बी. फॉर्मही इच्छुकांना वरिष्ठांनी देण्यासाठी पाचारण केले. मात्र प्रभाग एकमधून ओबीसी प्रवर्गातून अमित घुगे यांच्याऐवजी ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या गणेश गिते यांना उमेदवारी न मिळाल्यास आम्ही एबी फॉर्म न स्वीकारता अपक्ष निवडणूक लढवू, असा इशारा रंजना भानसी व अरुण पवार यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे यादीत नाव असलेल्या निष्ठावान अमित घुगे यांच्याऐवजी हस्ताक्षरात गिते नाव टाकून यादीत खाडाखोड करण्यात
आली. (प्रतिनिधी)