अन्यायकारक दरवाढ रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:33 AM2018-09-01T00:33:20+5:302018-09-01T00:33:42+5:30

नाशिक महानगर पालिका प्रशासनाने अन्यायकारक केलेली करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राष्टवादी कॉँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांना निवेदन देण्यात आले.

 Cancellation of unjustified tariffs | अन्यायकारक दरवाढ रद्द करावी

अन्यायकारक दरवाढ रद्द करावी

Next

नाशिकरोड : नाशिक महानगर पालिका प्रशासनाने अन्यायकारक केलेली करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राष्टवादी कॉँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांना निवेदन देण्यात आले.  माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा प्रशासनाने अन्यायकारक करवाढ करून नवीन मिळकतीसह मोकळ्या भुखंडांचे करयोग्य मुल्य वाढवल्यामुळे शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, रूग्णालये, सिनेमागृहे, शेतजमीन तसेच उद्योगांचे मोठे नुकसान होणार आहे. निवासी क्षेत्रासाठी १८ टक्के जादा करवाढ लागू करण्यात आली आहे. अनिवासी आणि उद्योग क्षेत्रासाठी अधिक वाढीव कर लागू करून करयोग्य मुल्यवाढ सुद्धा लावण्यात आलेली आहे. या करवाढीचा फटका उद्योगांना बसणार आहे. शहराला स्मार्ट सिटी बनवितांना नागरिकांना सोसवेल इतकी करवाढ केली असती तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला नसता. शहरवासीयांवर अन्यायकारक करवाढ लादली आहे.  निवेदनावर नाना महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, बाळासाहेब कर्डक, अंबादास खैरे, नंदन भास्करे, नगरसेविका सुषमा पगारे आदिंचा सह्या आहेत.

Web Title:  Cancellation of unjustified tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.