आज उमेदवारी अर्जांची छाननीप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:22 AM2019-10-05T01:22:06+5:302019-10-05T01:23:28+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे.
नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी शनिवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीच सदर छाननी प्रक्रिया होणार असून, निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज छाननीनंतर सोमवारी (दि.७) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे.
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दि. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघातून ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज नांदगाव आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून झालेले आहेत. जिल्ह्णातील पक्षीय राजकारणात क्षणाक्षणात बदलणाऱ्या घडामोडींमुळे अर्ज दाखल करणाऱ्यांकडे जसे लक्ष लागून होते तसेच अर्ज छाननी प्रक्रियेकडेदेखील जिल्ह्णाचे लक्ष असणार आहे. कुणाचा अर्ज बाद होतो हादेखील औत्सुक्याचा विषय असणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील चुरस वाढण्यास सुरुवात होणार असून, माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून ज्या ज्या ठिकाणाहून, अर्ज दाखल केले आहेत तेथेच सदरप्रक्रिया पार पडणार आहे.