पराभवाचे दु:ख पचविणारा उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:22+5:302021-01-22T04:13:22+5:30

लहवित ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमध्ये ‘क’ प्रवर्गात सत्यभामा सुखदेव लोहकरे यांना ३०५, तर शोभा विनोद लोहकरे यांना २८६ ...

The candidate who digested the grief of defeat won | पराभवाचे दु:ख पचविणारा उमेदवार विजयी

पराभवाचे दु:ख पचविणारा उमेदवार विजयी

Next

लहवित ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमध्ये ‘क’ प्रवर्गात सत्यभामा सुखदेव लोहकरे यांना ३०५, तर शोभा विनोद लोहकरे यांना २८६ मते पडली, पण दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधीने मतमोजणी कक्षात मतांची परस्पर विरोधी माहिती आपापल्या पॅनल नेतृत्वाला दिली. त्यामुळे पराभूत उमेदवार शोभा लोहकरे विजयी झाल्याचा आनंद समर्थक व पॅनलला झाला होता. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलला पंधरा पैकी आठ जागा मिळाल्याने त्यांचाच सरपंच होणार असे एकूण चित्र निर्माण झाले होते. परंतु निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी परिवर्तन पॅनलचे पराभूत उमेदवार सत्यभामा लोहकरे या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याचा निरोप निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आला. त्यामुाळे लोहकरे कुटुंबासह पॅनलच्या नेत्यांनी नाशिकला धाव घेतली. निवडणूक शाखेकडून अधिकृत जाहीर होणारी आकडेवारी मिळवली. त्यात निवडणुकीत पराभूत झाल्याच्या दु:खात असलेल्या सत्यभामा लोहकरे या विजयी झाल्याचा आनंदत्सोव साजरा करण्यात आला. लहवित ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास व परिवर्तन यांना सात-सात, तर एक अपक्ष असे संख्याबळ असून, त्यामुळे सरपंच कोणाचा होणार याची चर्चा रंगली आहे.

Web Title: The candidate who digested the grief of defeat won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.