इगतपुरीत उमेदवारांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:41+5:302021-06-10T04:10:41+5:30
इगतपुरी नगरपालिकेत ९ प्रभागांतून १८ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित होत्या. ...
इगतपुरी नगरपालिकेत ९ प्रभागांतून १८ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षित होत्या.
इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ५ प्रभागांतील ओबीसी उमेदवारांना फटका बसणार असून, त्यात प्रभाग क्रमांक १ मधील अपर्णा धात्रक, प्रभाव २ मधील रोशनी परदेशी, प्रभाव ३ मधील आरती कर्पे, प्रभाग ५ मधील उमेश कस्तुरे, प्रभाग ६ मधील दिनेश कोळेकर या उमेदवारांना पर्यायी व्यवस्था किंवा जनरल प्रवर्गात शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. हे पाचही ओबीसी प्रवर्गातील उमेदवार प्रथमतःच निवडणूक जिंकले असून, विकासाच्या दृष्टीने या प्रभागांमधील नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली होती. इगतपुरी नगरपालिकेत सातत्याने शिवसेनेची सत्ता असून, या नवीन चेहऱ्यांना त्याच किंवा इतर प्रभागांत नशीब अजमावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट....
आरक्षण रद्द केल्याने आमच्यावर खूप मोठा अन्यायच केला आहे. प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. या आरक्षणामुळे योग्य चेहरे न आल्यास विकास खुंटू शकतो. सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावा व आम्हाला न्याय द्यावा.
- उमेश कस्तुरे, नगरसेवक.
फोटो : ०९ इगतपुरी नगरपालिका
===Photopath===
090621\09nsk_29_09062021_13.jpg
===Caption===
फोटो : ०९ इगतपुरी नगरपालिका