उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त

By admin | Published: March 27, 2017 12:42 AM2017-03-27T00:42:49+5:302017-03-27T00:43:01+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लगबग दिसून येत आहे.

Candidates organized Sunday's Muhurat | उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त

उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त

Next

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लगबग दिसून येत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने विविध पॅनलमधील उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर तसेच सावानाच्या आवारात वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाऱ्या सभासदांना हात जोडून विनवणी करण्यात येत होती.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने वाचनालयात येणाऱ्या सभासदांची संख्यादेखील जास्त होती तसेच अनेक सभासद सुटीच्या दिवशी घरी असल्याने उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक वाचनालयाच्या आवारातही ग्रंथमित्र पॅनल आणि जनस्थान पॅनलच्या उमेदवारांनी, तर काही अपक्ष उमेदवारांनी दिवसभर तळ ठोकलेला होता. वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाऱ्या सभासदांना प्रत्येक उमेदवार गराडा घालून भंडावून सोडत असल्याचे चित्र रविवारी (दि. २६) बघायला मिळाले. वाचनालय परिसरात ज्याप्रमाणे उमेदवार तळ ठोकून उभे होते त्याचप्रमाणे पॅनलमधील अनेक उमेदवार वेगवेगळे गट करून शहरातील विविध भागांत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत होते. गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावर महारांगोळी काढण्यात आली होती, ही रांगोळी बघण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांची संख्या लक्षात घेऊन जनस्थान पॅनलने रविवारी गोदाघाटावर पुस्तक परिक्रमा या उपक्रमाचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.  प्रचाराच्या रणधुमाळीत सगळ्याच पॅनलकडून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत असले तरी खरे चित्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज सोमवारी धर्मादाय आयुक्त सुनावणीवर काय निकाल देतात याकडेही साहित्य रसिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates organized Sunday's Muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.