उमेदवारांचा खर्च सहा लाखांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:59 AM2019-10-19T01:59:13+5:302019-10-19T01:59:37+5:30
निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले असून, गुरुवारपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता निवडणूक खर्चात उमेदवारांनी जेमतेम ६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होऊन गेल्या बारा दिवसांत उमेदवारांनी जेमतेम खर्च केल्याचे हिशेब निवडणूक शाखेला सादर केले आहेत.
नाशिक : निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले असून, गुरुवारपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता निवडणूक खर्चात उमेदवारांनी जेमतेम ६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होऊन गेल्या बारा दिवसांत उमेदवारांनी जेमतेम खर्च केल्याचे हिशेब निवडणूक शाखेला सादर केले आहेत. यातून काही उमेदवारांचा आक्षेप असला तरी त्यांचाही खर्च साडेसहा लाखांपर्यंत गेलेला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा २८ लाख इतकी असली तरी प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत फारफार तर दहा लाखांपर्यंतच हिशेब उमेदवारांकडून मांडला जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल झालेल्या खर्चाच्या आकडेवारीवरून ग्रामीण आणि शहरी भागातूनही खर्चाला लगाम घालण्यात आल्याचे दिसत आहे. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या रेटकार्डनुसार उमेदवारांना केलेला खर्च निवडणूक शाखेला दाखवावा लागतो.
खर्च दाखविण्याचे आवाहन
अद्यापही निवडणुकीचा खर्च सादर करू न शकलेल्या उमेदवारांना निवडणूक शाखेने आवाहन केले असून, यापैकी एका उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हादेखील नोंदविला आहे. नियोजित वेळेत खर्चाची माहिती निवडणूक शाखेला देणे अपेक्षित असतानाही चांदवड येथील एका अपक्ष उमेदवाराला खर्च सादर न केल्याने आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये अगदी मंडपापासून ते जेवणापर्यंतचे अािण प्रचार साहित्यपासून ते सभांच्या नियोजनापर्यंतचे खर्च उमेदवारांना मांडावे लागत आहेत. प्रचाराची एकूणच उठलेली राळ पाहता उमेदवारांना वारेमाप खर्च करावा लागत असल्याचे बोलेले जाते.
असले तरी प्रत्यक्षात खर्चाच्या आकडेवारीवरून खर्चाची मर्यादा पाळली जात आहे की मंदीचा फटका याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चामध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांची आघाडी दिसून येते. देवळाली मतदारसंघातील सेनेच्या उमेदवाराकडून ६ लाख ७३ हजारांचा खर्च करण्यात आला आहे. नाशिक पश्चिममधील भाजपच्या उमेदवारानेदेखील ५ लाख ७६ हजार रुपये खर्च केल्याचे नमूद केलेले आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघातील राष्टÑवादीचा उमेदवारदेखील खर्चात आघाडीवर असल्याचे दिसून येते. काही राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार असले तरी खर्चात त्यांनी अजूनही उडी घेतली नसल्याचे दिसते. त्यांचा प्रचार मात्र जोरदार सुरू असल्याचे दिसते. जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा खर्च झालेला दिसतो. अन्य पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी खर्चाला कात्री लावल्याचेही त्यांनी सादर केलेल्या हिशेबावरून समोर आले आहे.