मनपातील अंगठेबहाद्दरांचे पगार हजेरी मशीनच्या आधारेच होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:28 AM2019-01-08T01:28:02+5:302019-01-08T01:28:19+5:30
महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली.
नाशिक : महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. कर्मचाऱ्यांना त्वरित हजेरी मशीनचा वापर करण्यास सांगावे तसेच पुढील महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन या मशीनच्या हजेरीद्वारेच करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या मुख्यालयात सकाळच्या वेळी प्रशासकीय कामे वेगाने करता यावी यासाठी प्रशासनाने अभ्यागतांना तीन वाजेनंतरच प्रवेश देण्याची सोय केली आहे. मात्र, असे असतानादेखील कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर नसतात किंवा मुख्यालयाच्या आवारात मुक्त विहार करीत असतात. काही चहाबाज कर्मचारी तर वारंवार मुख्यालयाबाहेर जात असतात. शनिवारी (दि.५) यासंदर्भात आयुक्तांनी अचानक केलेल्या पाहणीत अशाप्रकारचे कर्मचारी आढळल्याने आयुक्तांनी सोमवारी (दि.७) खातेप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाºयांना थंब इंप्रेशन मशीनची सक्ती करून त्याचा वापर केला जात नसल्याबद्दल विचारणा केली. यावेळी खातेप्रमुखांनी कर्मचाºयांच्या अडचणी आहेत. अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे नीट उमटत नाही, असे सांगितल्यानंतर आयुक्तांनी आपण जिल्हाधिकारी म्हणून काम बघितले आहे.
सात कर्मचाºयांची नावे आयुक्तांकडे!
महापालिकेच्या मुख्यालयात जे कर्मचारी गणवेश आणि ओळखपत्राशिवाय फिरत असतील त्यांची नावे कळविण्याबाबत आयुक्तांनी सुरक्षा विभागास कळविले होते. त्यानुसार सात कर्मचाºयांची नावे आयुक्तांना कळविण्यात आल्याचे वृत्त आहे.