विद्यार्थी संघटनांचा ‘कॅण्डल मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:42 AM2020-01-15T01:42:16+5:302020-01-15T01:42:57+5:30
एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला.
मालेगाव मध्य : एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला.
शहिदोंकी यादगार येथे कॅण्डल मार्चचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शहरातील मुशावरत चौक, भिक्कूचौक, चुनाभट्टी भागातून
विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत कॅण्डल मार्च काढल्यामुळे परिसर दणाणून गेला. सभेत समीर खान, इम्रान रशीद, यासीनअली, अजीज एजाज शेख, साद आमीर यांची भाषणे झाली. त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
पोलिसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्त्यावर अडविले. कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्यामुळे काहीकाळ वाहतूक कोलमडली होती. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक विनोद वसावे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.