गांजा तस्करीचे धागेदोरे मालेगावात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:01+5:302021-07-12T04:11:01+5:30

नववा मैल परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या रंगाची ...

Cannabis smuggling in Malegaon? | गांजा तस्करीचे धागेदोरे मालेगावात?

गांजा तस्करीचे धागेदोरे मालेगावात?

Next

नववा मैल परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारचे पार्किंग लाइट सुरू असलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळून आली होती. त्यावेळी पोलीस पथकाने गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता गाडीत कोणी नव्हते तर मागील बाजूस दोन गोण्या आढळून आल्या होत्या. पोलिसांनी गोण्या उघडल्या असता त्यामध्ये सुमारे ६० किलो गांजा आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. इनोव्हा कारच्या आरटीओ पासिंग क्रमांकावरून संशयित मुंबईतून आले असावे, असा अंदाज प्रथमदर्शनी वर्तविला गेला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान, मालेगाव तसेच चांदवड येथे जाऊन शोध घेतला असता दोघेजण मालेगाव तर एक चांदवडमधील असे एकूण तीन संशयितांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, मात्र संशयितांनी पोलिसांना गुंगारा दिल्याने मालेगावात पोलिसांच्या पदरी निराशा आली.

---इन्फो---

ग्रामीण भागात गांजा तस्करी

गांजा तस्करी प्रकरणात ग्रामीण भागातील संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी चालत असल्याचे दिसून झाले आहे त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक हॉटेलमध्ये रात्री हुक्का पार्लर, तर कुठे मटका चालत असल्याने ग्रामीण भागातील हॉटेल्स अवैध व्यवसायाचे केंद्र बनत चालले आहे. ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून अवैध व्यवसाय जोरात सुरू असले तरी याकडे मात्र ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Cannabis smuggling in Malegaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.