नरभक्षक बिबट्या अखेर ठार, रात्री १०.२७ वाजता शूटरने टिपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:41 AM2017-12-10T00:41:42+5:302017-12-10T01:16:07+5:30

चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणा-या व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आल्याचे वृत्त आहे.

The cannibal slipper was killed by the shooter at 10.27 pm | नरभक्षक बिबट्या अखेर ठार, रात्री १०.२७ वाजता शूटरने टिपले

नरभक्षक बिबट्या अखेर ठार, रात्री १०.२७ वाजता शूटरने टिपले

Next

जळगाव - चाळीसगाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाºया व सात बळी घेणाºया नरभक्षक बिबट्याला शनिवारी रात्री अखेर गोळ्या घालून ठार करण्यात यश आले.
हैद्राबाद येथून खास पाचारण करण्यात आलेला शॉर्प शूृटर नवाब शहाफत अली खान व त्यांचा मुलगा नक्षबंधू यांनी वरखेडे खुर्द परिसरातील खडका शिवारात या बिबट्याला शनिवारी रात्री १०.२७ मिनिटांनी टिपले आणि गिरणा पटट्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. नवाब यांनी ४५८ रायफल मधून झाडलेल्या एकाच गोळीत बिबट्या खाली कोसळला.
चाळीसगावचे तहसीलदार कैलास देवरे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. शनिवारी दुपारी चार वाजेपासून नवाब शहाफत व त्यांच्या मुलाने खडका शिवारात बिबट्याला टिपण्यासाठी तयारी केली होती. बराचवेळ होऊनही बिबट्या टप्प्यात येत नव्हता. शेवटी रात्रीच्या सुमारास बिबट्याला ठार मारण्यात त्यांना यश मिळाले.
या नरभक्षक बिबटयाने आतापर्यंत चार महिला व तीन बालकांसह सात जणांचे बळी घेतले आहेत. याशिवाय १२ जनावरांना त्याने फस्त केले आहे. यात भटकी कुत्री, बकºया, घोडे यांचा समावेश आहे. या बिबट्याच्या हल्ल्यातून तीन महिला व दोन मुली जखमी होऊन बचावल्या आहेत.
रात्रीच बिबट्याचे शव चाळीसगाव येथे आणण्यात आले. रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तसेच तो नरभक्षक का झाला याचे कारणही या शवविच्छेदनातून स्पष्ट होईल, अशी माहिती मिळाली.
गिरणेच्या पाण्याने तारले
शुक्रवारी सायंकाळी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे बिबट्या नदी पार करु शकला नाही. इतर वेळी नदीत पाणी नसल्याने तो सहजपणे इकडून तिकडे वावरत होता. पण गिरणेच्या आवर्तनाने नदीत पाणी असल्याने बिबट्या ती ओलांडू शकला नाही.

 
बिबट्याला ठार मारणारे नवाब शहाफत यांनी सांगितले की, रात्री बिबट्या वरखेडे गावाच्या मधोमध येत होता आणि समोरच १०-१२ लोक होते. त्याचवेळी हाच नरभक्षक बिबट्या असल्याचा असल्याचा अंदाज आल्याने आपण क्षणाचाही विलंब न लावता बिबट्यावर गोळी झाडली. ही गोळी झाडली नसती तर आज पुन्हा एका निरपराधाचा जीव गेला असता.
गेल्या पाच दिवसापासून आपण त्याचा अभ्यास करीत आहोत. तो दिवसा राहतो कुठे आणि झोपतो कुठे याची माहिती काढत होतो.कारण तो रात्री हल्ला करीत होता. त्यामुळे त्याच्या पाळतीवर होतो.
बिबट्याला जर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले असते तर १५ मिनिटांनी त्याचा परिणाम होण्यास सुरुवात होते. या अवधीत तो आपल्यावर प्रतिहल्ला करु शकला असता पण हा धोका न पत्करता आपण थेट गोळी झाडल्याचे ते म्हणाले. याशिवाय आणखी बिबट्या असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
आपणास रात्रीच्यावेळी बिबट्या दिसला कसा ... यावर ते म्हणाले की, आमचा हा खानदानी व्यवसाय आहे. आमच्या आजोंबापासून हा व्यवसाय करीत आहोत. त्यामुळे हा सर्व नजरेचा खेळ आहे. त्यावरुन आपण तोच नरभक्षक बिबट्याच असल्याचे ओळखू शकलो.

Web Title: The cannibal slipper was killed by the shooter at 10.27 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.